Home
Home चंद्रपूर टी.सी. व गुणपत्रिकेसाठी पैसे मागणाऱ्या शाळांची गय नाही; मनसेकडून कठोर कारवाईचा इशारा.

टी.सी. व गुणपत्रिकेसाठी पैसे मागणाऱ्या शाळांची गय नाही; मनसेकडून कठोर कारवाईचा इशारा.

0
88

HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(का. प्र.) – शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) आणि गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर रक्कम मागणाऱ्या शाळांची अजिबात गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांनी दिला आहे.

                     राज्य शासन व शिक्षण विभागाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना टी.सी. आणि गुणपत्रिका विनामूल्य देणे बंधनकारक आहे.

                          मात्र, काही शाळा व महाविद्यालयांकडून विविध कारणे पुढे करून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

         यासंदर्भात बोलताना किशोर मडगुलवार म्हणाले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क अबाधित ठेवणे ही शाळा प्रशासनाची जबाबदारी आहे.

                  टी.सी. किंवा गुणपत्रिका देण्यासाठी पैसे मागितल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाळांविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल.

  तसेच आवश्यक असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनही छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

         विद्यार्थी आणि पालकांनी अशा बेकायदेशीर मागण्यांना बळी न पडता पुराव्यासह तक्रारी या माझ्या नंबर 8055479401 वरती पाठवण्यात यावे असे आवाहनही त्यांनी केले.

   शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक लूट सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश मनसेने दिला आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here