Home
Home चंद्रपूर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोदीजींच्या यशस्वी कार्यकाळाचा केला पत्रकार परिषदेत गौरव!.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोदीजींच्या यशस्वी कार्यकाळाचा केला पत्रकार परिषदेत गौरव!.

0
37

HELLO CHANDA NEWS

 चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर येथील एनडी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोदीजींच्या यशस्वी कार्यकाळाचा गौरव केला, आणि देशासमोरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचा आढावा घेतला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतात सर्वाधिक कार्यकाळ पंतप्रधान राहिलेल्या गैरकाँग्रेसी पंतप्रधानांपैकी एक म्हणून आपला सुवर्ण इतिहास घडवला आहे असे उद्गार देखील माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी प्रवासाची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

        या पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मंचावर आमदार देवराव भोंगळे,चंद्रपूर मनपाच्या महापौर सौ.संगीता राजेंद्र खांडेकर चंद्रपूर जिल्हा भाजप चे अध्यक्ष हरीश शर्मा,चंदनसिंह चंदेल, राजेंद्र गांधी, राहुल पावडे, ब्रिजभूषण पाझारे, रवी लोणकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेला पत्रकार ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         पंतप्रधान विश्वगौरव, युगपुरुष नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वातील
एनडीए सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील ठळक मुद्दे एका पत्रकान्वये आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.

              एनडीए सरकार गेली १२ वर्षे जनतेच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत आहे. पंतप्रधान विश्वगौरव, युगपुरुष नरेंद्रभाई मोदीजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करून शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. या सरकारसाठी गरीब, शेतकरी, युवा आणि महिला हे विकासाच्या केंद्रस्थानी आहेत.

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा शासनाचा मूलमंत्र राहिला आहे.

   शासकीय योजनांचा शंभर टक्के लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यशस्वीपणे राबविण्यात आला. थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीमुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा झाला आणि लाखो बनावट लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले.

  या पारदर्शक व्यवस्थेमुळे तब्बल ४.३१ लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचले.

         देशाच्या सुरक्षेसाठी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकसारख्या धाडसी कारवाया करून दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देण्यात आले.

 हा नवा भारत अन्याय सहन करणारा नाही, तर प्रत्येक आव्हानाला ठाम आणि समर्थ उत्तर देणारा भारत आहे.

   एकेकाळी नक्षलवादाने ग्रासलेला ‘रेड कॉरिडॉर’ आज विकास आणि प्रगतीच्या ‘ग्रीन ग्रोथ झोन’मध्ये परिवर्तित होत आहे.

 गेली १२ वर्षे केवळ आकडेवारीची मांडणी नसून आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास ठरला आहे.

     प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ५८ कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून त्यापैकी ३२ कोटींहून अधिक खाती महिलांच्या नावावर आहेत.

            कोरोना महामारीच्या कठीण काळापासून आजपर्यंत ८१ कोटींहून अधिक नागरिकांना मोफत धान्य पुरविले जात आहे.

      आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ६० कोटींहून अधिक आरोग्य कार्ड वितरित करण्यात आले आहेत.

 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे ५८ कोटींहून अधिक नागरिकांना आर्थिक सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे.

      प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४ कोटींहून अधिक कुटुंबांना पक्क्या घरांचे स्वप्न साकार झाले आहे.

     उज्ज्वला योजनेद्वारे ११ कोटींहून अधिक महिलांना मोफत गॅस जोडणी देऊन धूरमुक्त जीवनाचा मार्ग खुला करण्यात आला.

जल जीवन मिशनअंतर्गत १६ कोटींहून अधिक घरांपर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचले आहे.

  स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत १२ कोटींहून अधिक शौचालयांची उभारणी करून स्वच्छतेची जनचळवळ उभी करण्यात आली.
पीएम स्वनिधी योजनेद्वारे ७४ लाखांहून अधिक लघुव्यावसायिकांना सुलभ कर्ज उपलब्ध झाले आहे. मुद्रा योजनेअंतर्गत ५७ कोटींहून अधिक कर्जवाटप करून लघु उद्योजकतेला नवे बळ देण्यात आले.

   पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे ३० लाखांहून अधिक कारागीर आणि पारंपरिक व्यावसायिकांना लाभ मिळाला आहे.

   जनजातीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी १५ हजार कोटी रुपयांचा निधी तर ‘धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान’साठी ७९ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

     पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ४.३ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी जमा करण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे ७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे १० लाख कोटी रुपयांचे स्वस्त कर्ज उपलब्ध झाले आहे.

शेतकऱ्यांना अधिक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी कर्जमर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

          मध्यमवर्गीयांना दिलासा देत आयकर सवलतीची मर्यादा वाढवून १२.७५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. ‘लखपती दीदी’ योजनेद्वारे ३ कोटींहून अधिक महिलांना आर्थिक सक्षमीकरणाची संधी मिळाली आहे.

        सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ४.५ कोटींहून अधिक खाती उघडून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आर्थिक पाया निर्माण करण्यात आला आहे.

                 सुरक्षा दलांमधील महिला अधिकाऱ्यांची संख्या ३ हजारांवरून ११ हजारांपर्यंत वाढवून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत १ कोटी घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात आली आहे.

      २०१४ ते २०२६ या कालखंडातील १२ वर्षांची वाटचाल भारताला अधिक सक्षम, समृद्ध आणि सुरक्षित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने सातत्याने पुढे नेत आहे.

विकास हा आमच्यासाठी २४ तास, सातही दिवस आणि बारा महिने चालणारा अखंड राष्ट्रीय संकल्प आहे.

     शासन संस्कृतीत आमूलाग्र बदल घडवून आणत ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाते त्यांचे उद्घाटनही वेळेत पूर्णत्वास नेण्याची कार्यपद्धती विकसित झाली आहे.

          ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा मंत्र आज रस्ते, पूल, स्टील, काँक्रीट, ऑप्टिकल फायबर आणि लाखो कोटींच्या गुंतवणुकीच्या स्वरूपात प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.

         माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी २००० साली सुरू केलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने ग्रामीण भारताचे चित्र पालटले आहे.

      देशातील गावांमध्ये सुमारे ८ लाख किलोमीटर पक्क्या रस्त्यांचे जाळे उभे राहिले असून त्यातील जवळपास ४ लाख किलोमीटर रस्ते गेल्या १२ वर्षांत बांधले गेले आहेत.

    पूर्वी गावातून शहरात जाण्यासाठी ८-८ तास लागत असत; आज अनेक ठिकाणी हे अंतर केवळ ३ तासांत पार करता येते.

              शेतीला पाणी हा विकासाचा मूलाधार मानून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ अभियान राबविण्यात आले.

 २०१५-१६ पासून आजपर्यंत १०९ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आले आहे.

 यामुळे कृषी उत्पादनक्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी चालना मिळाली आहे.

 २०१४ मध्ये ९१,२८७ किमी असलेले राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आज सुमारे १.४६ लाख किमीपर्यंत विस्तारले आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधणीचा वेग ११.६ किमी प्रतिदिनवरून सुमारे ३४ किमी प्रतिदिन इतका वाढला आहे. चेन्नब रेल ब्रिज, अटल टनेल यांसारख्या भव्य पायाभूत प्रकल्पांनी देशाच्या विकासाला नवी गती दिली आहे.

      भारतीय रेल्वेचे ९९.६ टक्क्यांहून अधिक ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील १,३३७ हून अधिक रेल्वे स्थानकांचे जागतिक दर्जाच्या सुविधांसह आधुनिकीकरण सुरू आहे.

                 वंदे भारत रेल्वे आणि आरआरटीएससारख्या उपक्रमांमुळे देशात आधुनिक मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीचे जाळे निर्माण होत आहे. आज देशात १६४ हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस गाड्या यशस्वीपणे धावत आहेत.

    २०१४ मध्ये केवळ ५ शहरांपुरते मर्यादित असलेले २४८ किमी मेट्रो जाळे आज २६ हुन अधिक शहरांमध्ये १,०९५ किमीपेक्षा अधिक विस्तारले आहे. स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांत देशात ७४ विमानतळ होते; गेल्या १२ वर्षांत ९० हून अधिक नवीन विमानतळ उभारून ही संख्या १६४ च्या पुढे नेण्यात आली आहे. उडान योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही हवाई प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे.

               सौभाग्य योजनेद्वारे प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.भारतनेट प्रकल्पाअंतर्गत २.१४ लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडून डिजिटल भारताचे स्वप्न ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात आले आहे.

 शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी गेल्या १२ वर्षांत २३ नवीन एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहमिशन इंद्रधनुष्यअंतर्गत ५.४ कोटींहून अधिक बालकांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय अभिमान आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दिशेने राजपथाचे ‘कर्तव्य पथ’मध्ये रूपांतर करण्यात आले आणि इंडिया गेट येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळांचा ‘पंचतीर्थ’ म्हणून विकास करण्यात आला.

      बिरसा मुंडा यांच्या जयंतीला ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून मान्यता देण्यात आली.Statue of Unity आणि नवीन संसद भवनासारख्या राष्ट्रीय अभिमानाच्या वास्तू उभारण्यात आल्या.

  अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली असून राष्ट्रीय युद्धस्मारक देशभक्तीची प्रेरणा देत आहे. जनता कर्फ्यू, थाळी-टाळी अभियान, हर घर तिरंगा आणि ‘एक पेड़ माँ के नाम’ यांसारख्या उपक्रमांनी देशातील १४० कोटी नागरिकांना एकात्मतेच्या सूत्रात बांधले.

    फिट इंडिया आणि व्होकल फॉर लोकल अभियानांनी स्वदेशी, आत्मनिर्भरता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश जनमानसात रुजविला.’वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाला मूर्त रूप देत भारत आज जगाला मार्गदर्शन करणारा आणि समाधान देणारा देश म्हणून उदयास आला आहे.

 ‘व्हॅक्सीन मैत्री’ उपक्रमाद्वारे कठीण काळात 99 देशांना मदत करून भारताने जागतिक विश्वास संपादन केला आहे.

यशस्वी जी-२० अध्यक्षपद, 39 नवीन दूतावासांची स्थापना आणि 70 लाख कोटी पेक्षा जास्त विदेशी गुंतवणूक प्रवाह हे भारतावरील जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे.

     जगातील ३८ देशांशी झालेल्या 9 फ्री ट्रेड अग्रीमेंट अर्थात मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय शेतकरी आणि उद्योगांसाठी नव्या बाजारपेठांचे दरवाजे खुले झाले आहेत.

               आज १७७ देश एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात, ही भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रभावाची साक्ष आहे.

 पंतप्रधान विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ पूर्ण केला हे देशासाठी व देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे.

   पंतप्रधान विश्वगौरव, युगपुरुष नरेंद्रभाई मोदीजी यांनी भारतीय राजकारणात दीर्घकालीन लोकाधारित नेतृत्वाचा नवा अध्याय निर्माण केला आहे.

             पंतप्रधान विश्वगौरव, युगपुरुष नरेंद्रभाई मोदी यांना जागतिक स्तरावर मिळालेले विविध 32 सन्मान आणि उच्च लोकप्रियता दर्शविते की भारताचे नेतृत्व आज जगभर प्रभावीपणे मान्यता प्राप्त करत आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here