HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : सिंदेवाही येथील आझाद चौक परिसरातील छुप्या खोल्यांमध्ये छापा टाकून पोलिसांनी सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा सामग्रीचा मोठा साठा जप्त करून मुख्य तस्कराला बेड्या ठोकल्या. सागर प्रमोदराव केकरे (३४, रा. आझाद चौक, सिंदेवाही) असे अटक आरोपीचे नाव आहे.
सिंदेवाहीतील आझाद चौक परिसरात अवैध विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का साहित्याचा मोठा साठा दडवून
ठेवल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
एलसीबीच्या पथकाने आझाद चौकातील संशयास्पद ठिकाणावर अचानक छापा टाकला. याला सागर केकरे याला घटनास्थळावरून रंगेहाथ ताब्यात घेतले.
त्या ठिकाणाची सखोल झडती घेतली असता, पोलिसांना प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा तंबाखूचा २ लाख ८४ हजार ८४५ रुपये किमतीचा मुद्देमाल मुद्देमाल आढळून आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
























