Home
Home चंद्रपूर रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ मानवसेवेचे कार्य – आ. किशोर जोरगेवार. जागतिक रक्तदान दिनानिमित्त भाजपच्या...

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ मानवसेवेचे कार्य – आ. किशोर जोरगेवार. जागतिक रक्तदान दिनानिमित्त भाजपच्या रक्तदान शिबिरात १५३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

0
91

HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(का.प्र.) : शासकीय रक्तपेढीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने जागतिक रक्तदान दिनानिमित्त रविवारी भाजप महानगर कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

  या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल १५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.

 यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, महामंत्री रविंद्र गुरनुले, मनपा गटनेते शेखर शेट्टी, प्रकाश देवतळे, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, अजय जयस्वाल, सुभाष अदमाने, स्वप्नील डुकरे, प्रदीप किरमे, राकेश नाकाडे, सायली तोंडरे,  कौसर खान, नगरसेविका आशा देशमुख, नगरसेवक भालचंद्र दानव, विमल कातकर, करणसिंह बैस, राशिद हुसेन, कार्तिक बोरेवार, निशिकांत महागावकर, तेजा सिंग, रज्जत ठाकूर, राकेश बोमनवार, अनिता झाडे, अस्मिता दोनाडकर आदी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे पवित्र कार्य आहे.

        अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी पीडित रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण तसेच थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी रक्ताची नितांत गरज असते.

अशा वेळी रक्तदात्यांनी दिलेला प्रत्येक रक्ताचा थेंब एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मोलाचा ठरतो.

          ते पुढे म्हणाले की, “शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

 समाजहितासाठी अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होणे हीच खरी मानवसेवा आहे.”

 “रक्तदानामुळे कोणतीही शारीरिक हानी होत नाही. उलट रक्तदानामुळे आरोग्य तपासणी होते आणि सामाजिक कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळते.

       त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले.

     यावेळी तब्बल ६३ वेळा रक्तदान करणारे अतुल हेमके यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

        त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here